शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रेल्वे पाससाठी मदत केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांना बारकोड स्कॅन करता येईना, नागरिक रांगेत गोंधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:41 IST

Mumbai Suburban Railway : १५ ऑगस्ट पासून प्रवास देण्यासाठी राज्य शासनाने सुरू।केलेल्या महापालिका अंतर्गत मदत केंद्रांवर कर्मचारी, अधिकारी यांना कोविड सर्टिफिकेटचे बारकोड स्कँन करता येत नसल्याने मोठी पंचाईत झाली असल्याचे निदर्शनास आले.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - १५ ऑगस्ट पासून प्रवास देण्यासाठी राज्य शासनाने सुरू।केलेल्या महापालिका अंतर्गत मदत केंद्रांवर कर्मचारी, अधिकारी यांना कोविड सर्टिफिकेटचे बारकोड स्कँन करता येत नसल्याने मोठी पंचाईत झाली असल्याचे निदर्शनास आले. बुधवारी डोंबिवली पूर्वेला नागरिकांनी गर्दी केली पण कर्मचारी कुशल नसल्याने सगळा गोंधळ उडाला होता. पोलीस यंत्रणा नागरिकांना।शांत रहा सांगत होती, तर मनपा कर्मचारी कामात व्यस्त होते. बारकोड स्कॅन कसा करायचा यामुळे ते हैराण झाले होते. ( Municipal employees could not scan barcodes at railway pass help center)

डोंबिवली पूर्वेला ५, पश्चिमेला ६, ठाकुर्लीत ५ असे केंद्र आहेत. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास सुविधा मिळावी यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली बुधवारपासून सर्टिफिकेट तपासणी मोहीम।सुरू।करण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली, ठाकुर्लीत एकूण १५ मदत केंद्र महापालिका उघडणार आहे. त्यासाठी।मनपाचे प्रभागक्षेत्र अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून भूमिका बजावतील. पश्चिमेला ६, पूर्वेकडे ५ आणि ठाकुर्लीत ४ मदत केंद्र राहणार आहेत.

सकाळी ७ वाजल्यापासून ते केंद्र सुरू होण्याची शक्यता होती, तसे झाले पण कर्मचारी कुशल नसल्याने त्याचा परिणाम सेवेवर झाला. तिकीट वितरण केंद्राचे हॉल, पादचारी पूल असे त्याचे लोकेशन असेल, त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे सर्टिफिकेट तपासून त्याना पास काढण्यासाठी शिक्का मारून अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती फ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पाटील यांनी दिली. त्यानंतर संबंधित नागरिक प्रवासासाठी पास, तिकिट काढायला जाऊ शकतात. त्याशिवाय त्याना अनुमती नसेल असेही स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेdombivaliडोंबिवली