शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:13 IST

निष्काळजीपणा, ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मुंबईहून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्यांची एकमेकांना धडक बसली. यामुळे धावत्या लोकलकडून पडल्याने  पाच प्रवाशांचा मृत्यू, तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या ४ महिन्यांनंतर मध्य रेल्वेच्या दोन विभागीय अभियंत्यांवर लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणा, ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कारण सांगत अभियंत्यांची नावे गुपित ठेवण्यात आली आहेत. अपघातातरेल्वेची कोणतीही चूक नाही. प्रवाशांच्या बॅगांमुळे अपघात झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता. मात्र,  रेल्वेचा तो दावा फोल ठरला, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुधाकर शिरसाट यांनी सोमवारी दिली. 

रेल्वेला त्यांनी सहकार्य करण्यासाठी तपासी पथकाने पत्रे दिली होती. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १९ जून रोजी प्रसिद्ध केले होते.

फोटो, व्हिडीओ व्हायरल

दोन ट्रॅकमधील अंतर हे ट्रॅकच्या मध्यापासून ५.३ मीटर असते, तर ट्रॅकच्या दोन्ही समोरासमोरील बाजूपासून ३.६ मीटर एवढे असते. लोकल एकमेकांना क्रॉस करताना सुमारे १.८ मीटर म्हणजेच ५, ६ फूट अंतर असते. वळणदार भागातही तेवढेच हवे असते. या तांत्रिक  बाबींचा तपास अधिकाऱ्यांनी अभ्यास केला. अपघात घडल्यानंतर रेल्वेने त्यांच्या तांत्रिक टीमच्या मदतीने अपघाताच्या ठिकाणी रुळांमधील अंतर किती होते, याची मोजणी केली. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंब्रा दुर्घटनेची सखोल चौकशी केली आहे. यामागील कारणे शोधली आहेत. संबंधित मार्गांवरील रेल्वेचे परिचालन सुरळीतपणे सुरू आहे.- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbra Accident: Railway Engineers Booked for Culpable Homicide After 4 Months

Web Summary : Four months after the Mumbra accident that killed five, two Central Railway engineers face culpable homicide charges. The railway police cited negligence and neglected track maintenance as reasons for the action. An investigation is underway, despite initial claims blaming passenger bags.
टॅग्स :mumbraमुंब्राrailwayरेल्वेAccidentअपघात