मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार
By अनिकेत घमंडी | Updated: October 31, 2022 16:57 IST2022-10-31T16:51:56+5:302022-10-31T16:57:57+5:30
मोदी प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात.

मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार
कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा संवाद कार्यक्रम कल्याण पश्चिममधील भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्रमांक 36 बैलबझार येथील 152 नंबर बूथवर परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी यांच्या निवासस्थानी ऐकण्यात आला. त्या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
मोदी प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक मोदींनी केले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, त्या निमित्ताल देशाच्या कानाकोपऱ्यात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येते, देशाच्या युवा वर्गाने राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाने स्वतःला झोकून दिले आहे हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कौशल्य विकासावर भर दिल्याने भारत प्रगतीच्या दिशेने जात असल्याचेही पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात संवाद कार्यक्रमात सांगितले. या संवाद कार्यक्रमामुळे पंतप्रधान मोदी यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत बूथपर्यंत पोहचत असल्याचे पवार म्हणाले.
यावेळी निखिल चव्हाण, कल्पेश जोशी, रमण भाई नायक, विजय शिरोडकर, समृध्द ताडमाडे, सोनाली पाटील, सागर जोशी, पूर्वा कुलकर्णी, राजु चव्हान, प्रताप टूमकर, जनार्दन कारभारी, भावेश ढोलकिया, यश जोशी, प्रकाश प्रजापती, मिहिर सेदलाणी, गिरीष रायचूर आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.