कारसेवकांप्रती मनसेची कृतज्ञता, श्रीराम मारूती मंदिरात केली महाआरती
By प्रशांत माने | Updated: January 22, 2024 15:28 IST2024-01-22T15:26:36+5:302024-01-22T15:28:31+5:30
अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कारसेवकांप्रती मनसेची कृतज्ञता, श्रीराम मारूती मंदिरात केली महाआरती
डोंबिवली: अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील श्रीराम मारूती मंदिरात मनसेने महाआरती करून कारसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाआरतीत मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा केडीएमसीचे माजी विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर, डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत, योगेश पाटील, दीपिका पेडणेकर, प्रल्हास म्हात्रे, मंदा पाटील, मिलिंद म्हात्रे, प्रशांत पोमेंडकर, संदीप (रमा) म्हात्रे, अरूण जांभळे, कोमल पाटील आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कारसेवकांचे श्रीराममंदिर उभारणीत मोठे योगदान होते. अनेकांनी बलिदान देखील दिले आहे. अयोध्येत श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पण आजच्याघडीला इतरांकडून याचा जो इव्हेंट चाललाय तसा इव्हेंट न करता राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे कारसेेवकांच्या प्रती कृतज्ञता म्हणून महाआरती करण्यात आली, अशी माहिती पक्षाचे डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत यांनी दिली.