शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:20 IST

२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे.

कल्याण-

२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे. मात्र जागेचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी सोडविला असा त्यांचा दावा आहे. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी असल्याची टिका शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.यासंदर्भात माजी नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, योजना मंजूर झाल्यावर जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र जागेचा प्रश्न निर्माण झाला. योजनेसाठी उभारलेल्या जाणा:या जलकुंभासाठी जागा नव्हती. ही जागा सरकारी होती. या जागेच्या बदल्यात महापालिकेस ८० कोटी सरकारला द्यावे लागले असते. ही जागा नागरीकांच्या पाणी योजनेसाठी द्यावी लागणार असल्याने ही रक्कम माफ करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हाधिका:यांकडे केली होती. तसेच यासंदर्भात जिल्हाधिका:यांसोबत २० नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती.

जागा देण्याचा निर्णय त्याच बैठकीत तत्वत: मंजूर करण्यात आला होता. तसेच पैसे माफ करण्याचाही विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे मनसे आमदारांनी श्रेय घेण्याचे काम करु नये असा सल्ला म्हात्रे यांनी मनसे आमदारांना दिला आहे. यापूर्वीही मानपाडा रस्त्याच्या कामावरुन शिवसेना खासदार आणि मनसे आमदार यांच्यात कामाच्या मंजूरीवरुन राजकारण रंगले होते. आत्ता पुन्हा अमृत योजनेच्या कामावरुन राजकारण रंगले आहे.

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेना