शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:47 IST

राज्यातील पहिली घटना असल्याचा शिंदे समर्थकांचा दावा

कल्याण-ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर आणि नगरसेवक हे त्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. आमदार भोईर यांनी कल्याण पाेलिस उपायुक्तांची भेट घेत साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये  अशी मागणी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारण हे प्रथमच होत आहे की, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यासाठी शिंदे गटातील आमदाराने मदतीचा पुढे केला आहे. 

राज्यात सत्ता संघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात सुरु असताना दुसरीकडे कल्याणमध्ये एक वेगळे राजकारण पाहावयास  मिळाले आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली. यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविला आहे.

पोलिसात हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार  भोईर शिंदे यांनी  नगरसेवकांसोबत पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. माजी नगरसेवक माेहन उगले, रवी पाटील, सुनिल वायले,जयवंत भाेईर, प्रभूनाथ भाेईर आदी उपस्थित हाेते. यावेळी आमदार भोईर यांनी सांगितले की, विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघे एकत्रित काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र विजय साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. आमदार भोईर यांच्या या पाऊलामुळे राजकीय वतरुळात एकच चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याण