MIDCच्या कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे- रामदास आठवले
By अनिकेत घमंडी | Updated: May 24, 2024 19:15 IST2024-05-24T19:14:55+5:302024-05-24T19:15:13+5:30
अंबर कंपनीच्या स्फोटाच्या ठिकाणी त्यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि त्या घटनेत ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले.

MIDCच्या कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे- रामदास आठवले
अनिकेत घमंडी, डोंबिवली: एमआयडीसीमधील कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करायला हवी, अवैध व्यवसाय, नियमांचे उल्लंघन होत असल्यास तातडीने ते थांबवणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नसल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. त्यात सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात असून त्यातील दोषींवर असणाऱ्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. अंबर कंपनीच्या स्फोटाच्या ठिकाणी त्यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि त्या घटनेत ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले.
रिऍक्टर असेल अथवा बॉयलर याचीही वेळोवेळी पाहणी व्हायला हवी, तसा योग्यतेचा अहवाल असायला हवा, त्यामुळे जे झाले ते दुर्देवी होते, अशा घटना घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्हीही पाठपुरावा करू, त्यांना सहकार्य करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.