KDMC कडून मराठी भाषा संवर्धन मोहिम; दोन दिवसात ३ लाख ४२ हजार रुपयांची पुस्तक विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 06:15 PM2021-01-22T18:15:03+5:302021-01-22T18:15:28+5:30

महापालिकेने प्रथम अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात विविध प्रकारची विविध विषयावरील २ लाख ५० हजार पुस्तके विक्रीसाठी मांडण्यात आली होती.

Marathi Language Conservation Campaign from KDMC; Book sales of Rs 3 lakh 42 thousand in two days | KDMC कडून मराठी भाषा संवर्धन मोहिम; दोन दिवसात ३ लाख ४२ हजार रुपयांची पुस्तक विक्री

KDMC कडून मराठी भाषा संवर्धन मोहिम; दोन दिवसात ३ लाख ४२ हजार रुपयांची पुस्तक विक्री

Next

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त महापालिका मुख्यालयात दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. दोन दिवसात ३ लाख ४२ हजार रुपयांची पुस्तक विक्री झाली आहे अशी माहिती महापालिकेचे अधिकारी दत्तात्रय लधवा यांनी दिली आहे.

महापालिकेने प्रथम अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात विविध प्रकारची विविध विषयावरील २ लाख ५० हजार पुस्तके विक्रीसाठी मांडण्यात आली होती. दोन दिवसात चार हजार ९२० पुस्तके विकली गेली. उद्यापासून महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे. दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Marathi Language Conservation Campaign from KDMC; Book sales of Rs 3 lakh 42 thousand in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.