शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मराठी कुटुंबावरही मारहाणीचा गुन्हा; मानपाडा येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:44 IST

तक्रारीवरून मराठी कुटुंबातील तीन व्यक्तींसह एका अनोळखी महिलेवर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला

कल्याण :  आपल्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रिना यांच्यावर पोक्सो आणि मारहाणीचा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला असताना, पांडे याच्या तक्रारीवरून मराठी कुटुंबातील तीन व्यक्तींसह एका अनोळखी महिलेवर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पिडीत अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसह खेळत असताना, आरोपी पांडे याने तिला जबरदस्तीने घरात ओढून घेतले आणि तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप पिडीतेच्या आईने केला आहे. पांडेला जाब  विचारण्यासाठी गेले असता, कुटुंबाला त्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर, मुलीला इमारतीच्या पॅसेजमध्ये खेळत असताना दंगा करू नको, असे सांगितले, म्हणून संबंधित कुटुंबाने आम्हा पती-पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप पांडेने केला आहे. मारहाणीत त्याच्या डोळ्यांवर दुखापत झाल्याचेही त्याने तक्रारीत नमूद केले आहे. पांडे सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे.

...अन्यथा मनसे कायदा हातात घेईल

मनसेचे माजी आ. प्रकाश भोईर यांनी सोमवारी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांची भेट घेऊन चर्चा केली.

भोईर यांनी  त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठी कुटुंबावर दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त केली. आरोपी पांडेवर लवकर कारवाई करावी, अन्यथा मनसे कायदा हातात घेईल, असा इशारा त्यांनी दिला.

तातडीने कारवाई करावी

चौकशी कसली करता कारवाई हवी. सत्ताधारी पक्षाने याकडे लक्ष द्यावे.  जे आरोपी यामध्ये आहेत, त्यांना अटक करावी. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा आमचा पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा उद्धवसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.

सखोल चौकशी करण्याची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आ. राजेश मोरे यांनी केली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी