शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली-कटाई नाका प्रकल्पाच्या कामात मोठा विलंब; ९०% काम पूर्ण, पण उर्वरित ६ महिने का लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:26 IST

कल्याण - डोंबिवली - नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत.

मुंबई : कल्याण - डोंबिवली - नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत. हे अंतर वाहतूककोंडीशिवाय सुसाट पार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ऐरोली कटाई नाका प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२६ उजाडणार आहे.  तोपर्यंत वाहन चालकांना कोंडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. आता एप्रिल २०२६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. एमएमआरडीएने ऐरोली कटाई नाका या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.३ किमी इतकी आहे. या मार्गामुळे कल्याण - डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर ७ किमीने कमी होईल. त्यातून या भागातील प्रवासाच्या वेळेत १५ मिनिटांनी बचत होणार आहे. या पहिल्या दोन टप्प्याचे काम यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र याला आता मोठा विलंब झाला आहे.सध्या ठाणे- बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या मार्गाचे सुमारे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचा समावेश आहे. हे दोन्ही बोगदे खणून पूर्ण झाले आहेत. 

कसा आहे प्रकल्प ?पहिल्या टप्प्यात ३.४३ किमी लांबीचा मार्ग ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या दरम्यान उभारला जात आहे. यात १.६९ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात २.५७ किमी लांबीचा मार्ग ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर रस्ता असा उभारला जात आहे. तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ येथून दिवा - पनवेल रेल्वे ओलांडून कल्याण शिळ रस्त्यावरील कटाई नाका कटाई नाका जंक्शनला जोडला जाणार आहे. हा मार्ग ६.७१ किमी लांबीचा असेल.

ऐरोली खाडी पूल ते ठाणे बेलापूर ९० टक्के कामे पूर्णदुसऱ्या टप्प्यात मुलुंड ऐरोली खाडी पूल ते ठाणे बेलापूर रोड या दरम्यान उन्नत रस्त्याची उभारणी सुरू आहे. सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उन्नत मार्गाचे सेगमेंट लिफ्टिंग, तसेच रस्ता दुभाजक, संरक्षक कठड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे ओव्हरब्रिजमधील स्टील गर्डर बसविणे पूर्ण झाले असून डेक स्लॅब काम प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यानंतर उड्डाणपुलावरील डांबरीकरण, विद्युत दिव्यांचे खांब बसविणे, ध्वनिरोधक पॅनेल बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Airoli-Katai Naka Project Delayed; 90% Complete, 6 Months Remaining?

Web Summary : The Airoli-Katai Naka project, aimed at easing Kalyan-Dombivli-Navi Mumbai travel, faces delays. Though 90% complete, the project's deadline extends to April 2026. The 12.3 km route promises a 15-minute travel time reduction, but commuters must endure congestion longer.
टॅग्स :kalyanकल्याण