लोकमत इम्पॅक्ट: अखेर डोंबिवली पूर्वेकडील 'त्या' गार्डनच्या सुशोभिकरणाला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:24 IST2021-03-19T15:23:48+5:302021-03-19T15:24:04+5:30
सध्या या गार्डन मध्ये नुतनीकरण करण्यासाठी साहित्य आणून ठेवण्यात आलं आहे,

लोकमत इम्पॅक्ट: अखेर डोंबिवली पूर्वेकडील 'त्या' गार्डनच्या सुशोभिकरणाला सुरवात
- मयुरी चव्हाण
कल्याण: डोंबिवली पूर्वेकडील एकतानगर परीसरातील गार्डनची दुरवस्था व या ठिकाणी जुगाऱ्यांनीही कब्जा केला होता यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते.अनेक नागरिकांनी लोकमतकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. अखेर या या गार्डनच्या कामाला सुरवात झाली असून नागरिकांनी याबाबत लोकमतचे आभार मानलेय. पाहुयात नागरिकांनी या विषयी काय प्रतिक्रिया दिल्या आहे.
सध्या या गार्डन मध्ये नुतनीकरण करण्यासाठी साहित्य आणून ठेवण्यात आलं आहे, कामगारही या ठिकाणी काम करताना दिसतायेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गार्डनच्या कामाला अखेर सुरवात झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केलंय. सुरवातीला नागरिक याबाबत समोर येऊन बोलण्यास घाबरत होते. मात्र आता नागरिक लोकमतच्या माध्यमातून बोलू लागलेत. लोकमत हे तुमच्या हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे घाबरू नका तुमच्या समस्या आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.