डोंबिवलीतील लोढा हेवन शांती उपवन इमारत प्रकरण, रहिवासियांना हक्काची घरे आणि भाडेही दिले जाणार
By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2023 17:48 IST2023-03-08T17:46:51+5:302023-03-08T17:48:35+5:30
महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस पदाधिकारी राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांच्यासह शांती उपवन या इमारतीमध्ये राहणारे नागरीकही उपस्थित होते.

डोंबिवलीतील लोढा हेवन शांती उपवन इमारत प्रकरण, रहिवासियांना हक्काची घरे आणि भाडेही दिले जाणार
कल्याण - डोंबिवली पूर्व भागातील लोढा हेवनमधील शांती उपवन या इमारतीला तडे गेल्याने या इमारतीमधील नागरीकांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीपश्चात इमारतीमधील नागरीकांना बिल्डरकडून घरे बांधून दिली जातील. तसेच बांधकाम पूर्ण होईर्पयत रहिवासियांना भाडे ही दिले जाईल अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस पदाधिकारी राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांच्यासह शांती उपवन या इमारतीमध्ये राहणारे नागरीकही उपस्थित होते. शांती उपवन या इमारतीला तडे गेल्याने या इमारतीत राहणा:या २४० सदनिकाधारकांचा वास्तव्याचा प्रश्न उद्भवला आहे. या नागरीकांना बिल्डरकडून घरे बांधून दिली जाती. त्यासाठी दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्या दरम्यान या नागरीकांच्या घराचे भाडे दिले जाईल. खासदारांनी पुढाकार घेऊन बैठक घेतल्याने शांती उपवनमधील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
चौकट-मेट्रो रेल्वे बदलापूर्पयत नेणार
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. त्याचबरोबर कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. त्याचे टेंडरही काढण्यात आले. मात्र उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर याठिकाणीही शेवटच्या टोकार्पयत मेट्रो नेण्याचा संकल्प आहे. बदलापूर्पयत मेट्रो नेण्याची प्रोव्हीजन आम्ही केली आहे. तशा सूचनाही एमएमआरडीएला दिल्या असल्याचे यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले.
चौकट-सरकार शेतक:यांच्या पाठीशी
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वीही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून १२ हजार कोटी रुपये शेतक:यांच्या खात्यात जमा केले. हे सरकार शेतक:यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. राज्याच्या अर्थ संकल्पातही शेतक:यांचा नक्कीच चांगला विचार केला जाईल असा विश्वासही खासदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.