शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

दुकानदारांनी निर्बंधांनाच धातले ‘कुलूप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:49 IST

कल्याण, डोंबिवलीत सायंकाळी ७ नंतरही काही दुकाने उघडी : पोलिसांना पाहताच उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी गुरुवारपासून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करण्याचा आदेश दिला असतानाही कल्याण व डोंबिवलीत अनेक दुकाने ७ नंतरही उघडी होती. पोलिसांची गाडी येताना पाहून अनेक दुकानदार दुकानांचे शटर खाली ओढत होते. मात्र पोलीस दिसेनासे होताच पुन्हा दुकाने उघडत होते. त्याचवेळी सरबत, वडापाव, भेळपुरी, चायनीजच्या गाड्यांनी निर्बंध पाळल्याचे दिसत होते.

मनपा हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गुरुवारी या निर्बंधांचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी दुकाने बंद करण्याकरिता फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेक दुकाने सात वाजून गेले तरी उघडीच होती. पोलिसांनी गाडी थांवबून दुकाने उघडी असलेल्या दुकानदारांना तंबी दिली. कोरोनाचे नियम पाळा, आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केले. मात्र काही मोजक्या दुकानदारांनी सातच्या आतच शटर डाऊन केले होते. खाद्यपदार्थ, शीतपेयाच्या हातगाड्यांनाही सातपर्यंत व्यवसायाची मुभा असल्याने या गाड्या बंद झाल्या. मात्र दुकानदारांनी लॉकडाऊनचे निर्बंध फारसे मनावर घेतलेले नाहीत.

कोरोनाचे २६४ रुग्णकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात गुरुवारी कोरोनाच्या २६४ रुग्णांची भर पडली. मागील २४ तासांत १६८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमुळे महापालिका परिसरातील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ७२९ वर पोहोचली आहे. तर, त्यापैकी ६२ हजार ०६४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या दोन हजार ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

डोंबिवली स्थानक परिसरात संमिश्र प्रतिसाद; हातगाड्या सुरूच 

डोंबिवली :  शहरातील बहुतांश भागात गुरुवारी निर्बंधाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी मुख्य चौकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.  रेल्वेस्थानक परिसरात मात्र काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले.पोळी-भाजी केंद्रे, खाद्यगृह, बार-रेस्टॉरंट, परमिट रूम, आइस्क्रीम पार्लर, ज्युस सेंटर यांना ११ वाजेपर्यंतची मुभा दिली आहे. परंतु, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात काही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सातनंतर सुरू होत्या. शिववडापावच्या गाड्या राजरोस सुरू होत्या. स्थानक परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. परंतु, मानपाडा रोडवर कपडे, बूट-चप्पल, ज्वेलर्स ही दुकानेही रात्री सुरूच होती. पाथर्ली परिसरात मटणविक्रीची दुकाने शटर अर्ध्यावर ठेवून बिनदिक्कत सुरू होती. खाऊगल्ली असलेल्या पेंढरकर महाविद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या मात्र संध्याकाळी बंद होत्या. रिक्षात दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडूनही जादा प्रवासी भरून वाहतूक सुरू असल्याचे व नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. तर, शेलारनाका परिसरात नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाले होते. त्यामुळे निर्बंध घालण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून आले. 

 

टॅग्स :thaneठाणेkalyan-pcकल्याण