दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Updated: August 8, 2023 17:53 IST2023-08-08T17:48:33+5:302023-08-08T17:53:21+5:30
ट्रेनमध्ये बसवण्याच्या बहाण्याने राकेश विश्वकर्मा (२०) व अमितकुमार धीरमलानी (२६, रा. उल्हासनगर) या दोघांना डिसेंबर २०१२ मध्ये उल्हासनगर येथील वडोळगाव परिसरात आरोपी घेऊन गेले.

दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल
कल्याण : पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या बलविंदरसिंग बलवीरसिंग राठोड (२२), दिलजीत बाबूसिंग लबाना (२३), रैना असरफ खान (२५) आणि भालचंद्र हरिदास महाले (१९, सर्व रा. उल्हासनगर) या चौकडीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ट्रेनमध्ये बसवण्याच्या बहाण्याने राकेश विश्वकर्मा (२०) व अमितकुमार धीरमलानी (२६, रा. उल्हासनगर) या दोघांना डिसेंबर २०१२ मध्ये उल्हासनगर येथील वडोळगाव परिसरात आरोपी घेऊन गेले. याठिकाणी चाकूने गळा कापून त्यांची हत्या केली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एम. डी. डांगे यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सहायक सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार भालचंद्र पवार यांनी मदत केली.