किसन कथोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, उपनगरीय रेल्वे सेवेबाबत ११ मागण्यांचे निवेदन
By अनिकेत घमंडी | Updated: July 6, 2023 16:31 IST2023-07-06T16:30:43+5:302023-07-06T16:31:06+5:30
डोंबिवली: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार किसन कथोरे यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे भेट घेऊन, विविध प्रवासी ...

किसन कथोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, उपनगरीय रेल्वे सेवेबाबत ११ मागण्यांचे निवेदन
डोंबिवली: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार किसन कथोरे यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे भेट घेऊन, विविध प्रवासी संघानेच्या मागण्यां संदर्भात चर्चा केली, प्रामुख्याने मध्य रेल्वे वरील उपनगरीय रेल्वे सेवे बद्दल चर्चा करून ११ मागण्यांचे निवेदन या वेळी रेल्वे मंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली.
ज्यामध्ये, कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा दरम्यान लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, बदलापूर व वांगणी रेल्वे स्टेशनचा जलद विकास करून प्रवाश्यांना अधिक सुविधा उपलब्द करून द्याव्यात, गुरवली रेल्वे स्टेशन चे काम लवकरात लवकर सुरू करणे, मुरबाड रेल्वे साठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरळीत करणे, नवीन कॉरिडॉर वर कळवा-मुंब्रा सेक्शन वर गाड्यांना थांबा देणे, वसई-दिवा-पनवेल-रोहा सेक्शन वर गाड्या वाढवणे. अश्या विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.
या प्रसंगी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व मागण्यां बद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले, या वेळी भारतीय जनता पार्टी आयटी सेल प्रदेश समन्वयक डॉ.मिलिंद धारवाडकर व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील उपस्थित होते.