शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

‘खाकीतील सखीं’चा रेलरोमियोंना हिसका; छेडछाड, पाठलाग करण्याच्या ५०९ तक्रारींत केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:40 IST

रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिसांचा आधार वाटावा, अडीअडचणीच्या काळात संपर्क करता यावा, या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ हे अभियान सुरू केले.

- अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सुरेखा (नाव बदलले आहे) डोंबिवलीला दरवाजात उभी राहायची व गाडी मुंब्रा स्टेशनच्या जवळ पोहोचल्यावर तिच्या छातीत धडधड सुरू व्हायची. मुलांचे एक टोळके मुंब्र्याला चढल्यापासून सुरेखा मुलुंडला उतरेपर्यंत शेरेबाजी, अश्लील हावभाव करून तिला हैराण करायचे. राधिका (नाव बदलले आहे) दादरला लोकल पकडायची. एक तरुण त्याच डब्यात लोकल पकडायचा आणि ठाण्यात उतरलेल्या राधिकाचा पाठलाग करायचा. ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ या अभियानात त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केली. त्यानंतर मुंब्र्यातील त्या टोळक्याला सुरेखाच्या समक्ष पोलिसांनी चौदावे रत्न दाखवले तर पाठलाग करणारा तो तरुण चार दिवसानंतर पुन्हा दिसला नाही.

रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिसांचा आधार वाटावा, अडीअडचणीच्या काळात संपर्क करता यावा, या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ हे अभियान सुरू केले. वर्षभरात महिला प्रवाशांची छेडछाड करण्याच्या, त्यांचा पाठलाग करण्याच्या ५०९ तक्रारी प्राप्त झाल्या. या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली.

महिला प्रवाशांना खटकणारी गोष्ट व्यक्त करता यावी, यासाठी महिला पोलिस अधिकारी, अंमलदार या प्रवासी महिला आणि रेल्वे पोलिस यातील दुवा बनल्या. त्यांनी ४८३ व्हॉट्सॲप ग्रुप बनवले. त्याद्वारे ९,२७३ महिला जोडल्या. महिलांची तक्रार, अडचण त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करून कळवली की, त्वरित मदत केली जाते. मध्य आणि पश्चिम रेल्वे आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या १७ पोलिस ठाण्यांत कोणत्या पोलिस ठाण्याची जबाबदारी कुठल्या महिला अधिकाऱ्याकडे आहे, याची माहिती उपलब्ध आहे.

आतापर्यंत ८३ गुन्ह्यांची नोंदमहिला सुरक्षेकरिता रेल्वेने उपलब्ध केलेल्या १५१२ या हेल्पलाईनवर वर्षभरात एकूण ४२ हजार ८९८ कॉल प्राप्त झाले. त्या सर्वांचे निराकरण करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत ८३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. एकूण कॉलपैकी नऊ हजार २२८ महिलांचे कॉल होते. त्यामधील काही तक्रारींची दखल घेऊन २९ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. 

महिला प्रवाशांना आवाहन करतो की, अधिकाधिक महिलांनी ‘खाकीतील सखी’ या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क करून तेथील महिला अधिकारी, अंमलदार यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. जेणेकरून समस्या आल्यास ती तत्काळ सोडवण्यास सहाय्य होईल.डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस

टॅग्स :railwayरेल्वे