शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

केडीएमटी खाजगी यंत्रणेद्वारे चालवणार बस; अर्थसंकल्पात खर्च कपातीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:05 IST

कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम, मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीला २०२० चा अर्थसंकल्प सादर झाला. पण लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले.

कल्याण :  कोरोनाचा फटका केडीएमटीला चांगलाच बसल्याचे उपक्रमाच्या २०२१-२०२२ च्या सादर झालेल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी १०५ कोटी ९८ लाख रुपये जमा आणि १०३ कोटी २३ लाख रुपये खर्चाचा, असा २ कोटी ४० लाख रुपये किमतीचा शिलकी अर्थसंकल्प मांडला. 

२०२० ते आजतागायत कोरोनाचा राहिलेला प्रादुर्भावाचे सावट या अर्थसंकल्पावर आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे वाहतुकीला आणि पर्यायाने उत्पन्नाला आलेल्या मर्यादा पाहता उपक्रमाने खर्च कपातीचे धोरण स्वीकारताना खासगी बाह्य यंत्रणेद्वारे बस चालवून खर्चावर मर्यादा आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीला २०२० चा अर्थसंकल्प सादर झाला. पण लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फेरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. सोशल डिस्टन्सिंगमुळे वाहतुकीला मर्यादा आल्या आहेत. पर्यायाने उत्पन्नातच घट झाल्याने खर्च कपातीचे धोरण यंदाच्या अर्थसंकल्पात अधोरेखित केले गेल्याचे दिसून आले. २०२१-२०२२ या वर्षात सरकारच्या निर्देशानुसार जीसीसी, एनसीसी, एएमसी या उपलब्ध पर्यायाद्वारे प्रवासी वाहतूक चालवून खर्चावर मर्यादा आणण्याचे धोरण अवलंबिले आहे. 

स्मार्ट सिटी अंतर्गत आयटीएमएस या अंतर्गत ई-तिकिटींग, मोबाईल ॲप, रिअल टाईमिंग वेहिकल ट्रेकिंग सिस्टीम आदी यंत्रणा राबवून प्रवाशांना सुलभ नियमित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात अत्याधुनिक प्रवासी थांबे यांचाही समावेश आहे.

क्रीडा प्रशिक्षण केंद्र ; महिला व बालकल्याणसाठी पाच कोटीकेडीएमसीतील विद्यार्थ्यांना सरकारच्या राज्य, जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेत क्रीडा नैपुण्य प्राप्त होण्यासाठी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी मनपातर्फे चांगल्या दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करणे प्रस्तावित असून, यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक ज्ञान मिळून त्यांचा क्रीडा विषयक दर्जा उंचावेल व त्याचा त्यांचे व्यक्तिगत विकासासाठी निश्चितच लाभ होईल, असे मत सूर्यवंशी यांनी प्राथमिक शिक्षण विभागावर बोलताना मांडले. महिलांचा व बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकारी निर्देशानुसार मनपा क्षेत्रातील महिला व बालकांसाठी विविध योजना राबवण्यासाठी ५ कोटी २३ लाखांची तरतूद आयुक्तांनी महिला व बाल कल्याण कार्यक्रमांतर्गत केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस