केडीएमसीची परिवहन समिती तूर्तास नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:19 AM2020-11-21T00:19:44+5:302020-11-21T00:19:56+5:30

निवडणूक लांबणीवर : रिक्त पदांंचाही निर्णय रखडला

KDMC's Transport Committee | केडीएमसीची परिवहन समिती तूर्तास नामधारी

केडीएमसीची परिवहन समिती तूर्तास नामधारी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नगरसेवकांचा संपलेला कालावधी तसेच निवडणूक लांबणीवर पडल्याने केडीएमसीत सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे मनपातील परिवहनवगळता अन्य सर्व समित्या बरखास्त झाल्या आहेत. दरम्यान, परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक रखडली असताना फेब्रुवारीत समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. एका सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदाबाबतही सरकारकडून निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे केडीएमसीची निवडणूक होत नाही, तोपर्यंत समितीवर नव्या सदस्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. परिणामी, तूर्तास समिती नामधारी राहणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.
केडीएमसीतील स्थायी, शिक्षण, वृक्ष प्राधिकरण व महिला-बालकल्याण समिती संपुष्टात आली आहे. मात्र, नगरसेवकांचा सहभाग नसलेली परिवहन समिती अद्याप अस्तित्वात आहे. या समितीत १३ सदस्य आहेत. तर, स्थायी समितीचा सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. परंतु, सध्या स्थायीचे सभापतीपद व समितीमधील एका सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ते पदही रिक्त आहे.परिवहनची सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे, परंतु दोन महिने उलटूनही तारीख ठरलेली नाही. दुसरीकडे फेब्रुवारीत सहा सदस्यही विहीत कालावधीअंती निवृत्त होत आहेत. 
परिवहन सदस्यांची निवड महासभेत नगरसेवकांकडून होते. परंतु, तोपर्यंत लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात येणे कठीण असल्याने त्यांच्या निवडीसह पदसिद्ध सदस्य आणि रिक्त पद भरणे, या संदर्भात पेच उभा राहणार आहे.

सदस्य निवडीचा पेच
nनगरसेवकांची मुदत संपण्यापूर्वी सभापती मनोज चौधरी यांनी परिवहनची सभा घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली. परंतु, जी सभा होईल ती सभापतीपदाच्या निवडणुकीचीच होईल, असे सचिव कार्यालयाचे म्हणणे आहे.
nफेब्रुवारीत सहा सदस्य निवृत्त होत असल्याने त्यांच्याही निवडीचा पेच उभा राहणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या निवृत्तीनंतर प्रशासकीय राजवटीत समिती अस्तित्वात राहिली असली तरी तिचे अस्तित्व लोकप्रतिनिधींची राजवट येईपर्यंत नामधारीच राहणार आहे.
nत्यात शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांच्या निधनाने रिक्त झालेले पद भरण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच केडीएमसीने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर सरकारने अद्याप मत कळवलेले नाही.

Web Title: KDMC's Transport Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.