शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

हवेची गुणवत्ता खराब करणाऱ्या बिल्डरांना केडीएमसीच्या नव्या आयुक्तांचा दणका

By मुरलीधर भवार | Updated: November 21, 2023 18:01 IST

नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे.

कल्याण-प्रदूषणामुळे वातावरणातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील हवेची गुणवत्ता खालवली असल्याने ज्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी धूर निर्माण होते. अशा बांधकाम प्रकल्पधारकांनी त्यांच्या साईटच्या भोवती पत्र्यांचे संरक्षण उभारावे असे सांगण्यात आले होते. ज्या बांधकाम प्रकल्पधारकांनी अशा पत्र्यांच्या शेड लावलेल्या नाहीत अशा २५ बिल्डरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यालयापासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद केले. नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे.

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात हवेची गूणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापलिकेस चांगलेच फटकारले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर विविध महापालिकांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेतल्या होत्या. ८ नोव्हेंबर रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ.. भाऊसाहेब दांगडे यांनी ऑनलाईन  बैठक गेतली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळ हे देखील उपस्थित होते. ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवत किमान ३५ फुट उंच पत्रे उभारले पाहिजेत. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना हिरव्या कापड, ज्यूट शीट, ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी. त्याठिकाणीची पाहणी करण्याकरीता पथके नेमली होती. ज्या ठिकाणी अंमलबजावणी केली जात नाही. त्याठिकाणची व्हिडीओग्राफी करण्यात यावी असे आदेश दिले होते. आयुक्त दांगडे याची बदली झाली. त्यांच्या बदलीपश्चात नव्या आयुक्त जाखड यांनी या प्रकरणी २५ बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहे. तसेच छत्रपती शिवाजीचौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी केली आहे.

दरम्यान डोंबिवली पूर्वेतील टंडन रोडवरील तळ अधिक तीन मजल्याची साखरी गणेश सोसायटी या इमारतीचे पुनर्विकासासाठी तोडकाम करताना संबंधितांनी धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने हे पाडकाम थांबविण्याची कारवाई सहाय्यक आयुक्त आयुक्त सोनम देशमुख यांच्या पथकाने केली आहे. तसेच पाडकाम करणाऱ््यास नोटीस बजाविण्यात आली. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात बांधकाम साहित्याची वाहतुक करणारी जी वाहने वायू प्रदुषण नियंत्रण सूचनांचे पालन करत नसल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जाखड यांनी दिले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागास कळविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याण