धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 01:08 IST2021-02-09T01:07:58+5:302021-02-09T01:08:13+5:30

इमारत तोडण्यात येऊ नये, यासाठी काही मंडळी न्यायालयात गेली होती.

KDMC's hammer on dangerous building | धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या मुस्तफा मंजिल या धोकादायक इमारतीवर महापालिकेने सोमवारी हातोडा चालविला.

ही इमारत तळ अधिक तीन मजली होती. ती धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर करून महापालिकेने नोटीस बजावली होती. मात्र, इमारत तोडण्यात येऊ नये, यासाठी काही मंडळी न्यायालयात गेली होती. त्यावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता. तो आदेश उठताच महापालिकेने ही इमारत पाडण्याची कारवाई केली. ती धोकादायक असतानाही या इमारतीत एक लॉज चालविला जात होता, तसेच एका डॉक्टरचे क्लिनिक होते. त्याचबरोबर इमारतीच्या तळमजल्यावर दुकानेही होती.
 

Web Title: KDMC's hammer on dangerous building