KDMC: केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस

By मुरलीधर भवार | Updated: October 8, 2022 16:15 IST2022-10-08T16:13:57+5:302022-10-08T16:15:09+5:30

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने कामगारांना दिवाळी निमित्त २५ हजार रुपयांचा बोनस दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.

KDMC: KDMC workers want bonus of 25 thousand | KDMC: केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस

KDMC: केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस

- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने कामगारांना दिवाळी निमित्त २५ हजार रुपयांचा बोनस दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रमुख बाळ हरदास यांच्यासह पदाधिकारी सचिन बासरे आणि रवी पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे ही मागणी केली आहे. दरम्यान महात्मा गांधी म्युन्सिपल कर्मचारी सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबू जेठवा आणि कार्याध्यक्ष रमेश पौळकर यांनी देखील महापालिका कर्मचा:यांना दिवाळी निमित्त ३० हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे प्रमुख चरण सिंग टाक यांनी कामगारांना २० हजार रुपये बोनस दिला जावा अशी मागणी केली आहे. मागच्या दिवाळीला प्रत्येक कामगाराला १४ हजार ५०० रुपये बोनस मिळाला होता. यंदा त्यात वाढ करुन द्यावी अशी सर्वच कामगार संघटनांची मागणी आहे.

Web Title: KDMC: KDMC workers want bonus of 25 thousand