अखेर केडीएमसीने " ती" कमान तोडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 21:45 IST2022-01-08T21:45:05+5:302022-01-08T21:45:14+5:30
डोंबिवली पूर्व सोनारपाडा, शंकरानगर येथील बऱ्याच दिवसापासून संवेदनशील झालेली कल्याण शिळ रोड वरील मोठी कमान तोडण्याची कारवाई केडीएमसीने केली आहे.

अखेर केडीएमसीने " ती" कमान तोडली !
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
डोंबिवली पूर्व सोनारपाडा, शंकरानगर येथील बऱ्याच दिवसापासून संवेदनशील झालेली कल्याण शिळ रोड वरील मोठी कमान तोडण्याची कारवाई केडीएमसीने केली आहे. त्याचप्रमाणे नांदिवली येथील मुख्य रस्त्यावरील 84 शेड,4 जोते व 2 गाळ्यांचे बांधकामदेखील निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी महापालिका पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी,1 पोकलेन, 2 कॉम्प्रेसर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे विभागीय उपायुक्त डॉ. सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 4/जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व, पुना लिंक रोड येथील चाळीतील चालू असलेले रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस इ.च्या सहाय्याने करण्यात आली.