Kalyan Dombivli Municipal Election 2026 Winners: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाला मोठी खूशखबर मिळाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगपालिका क्षेत्रामध्ये आसावरी नवरे, रेखा चौधरी आणि रंजना पेणकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच भाजपाच्या खात्यात तीन जागा जमा झाल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीमधील प्रभाग क्रमांक १८ अ मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून रेखा चौधरी (Rekha Chaudhary) यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे येथून रेखा चौधरी या मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक २६ क मधून भाजपाच्या आसावरी नवरे (Asawari Navare) यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. विरोधात उमेदवारच नसल्याने आसावरी नवरे यांचाही बिनविरोध विज निश्चित झाला आहे.पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'.
त्याशिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या रंजना पेणकर (Ranjana Penkar) ह्या प्रभाग क्रमांक २६ ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथेही भाजपा उमेदवारा व्यतिरिक्त कुणीही उमेदवारी दाखल केली नव्हती. त्यामुळे निकालाआधीच भाजपाच्या खात्यात तीन जागा जमा झाल्या आहेत.
Web Summary : Before voting, the BJP secured three seats unopposed in Kalyan-Dombivali Municipal Corporation as Asavari Navare, Rekha Choudhari, and Ranjana Penkar were elected without opposition. This gives the BJP an early advantage.
Web Summary : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका में मतदान से पहले भाजपा ने तीन सीटें निर्विरोध जीत लीं क्योंकि आसावरी नवरे, रेखा चौधरी और रंजना पेनकर निर्विरोध निर्वाचित हुईं। इससे भाजपा को शुरुआती बढ़त मिली है।