शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली : मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने 'या' वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 21:50 IST

अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकांनंही सुरू करण्याची परवानगी. पालिकेनं जारी केली नियमावली.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकांनंही सुरू करण्याची परवानगी.पालिकेनं जारी केली नियमावली.

गेल्या काही  दिवसांपासून कल्याणडोंबिवली शहरात रुग्णसंख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास केडीएमसीने परवानगी दिली आहे. आठवड्यातून केवळ 5 दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णसंख्या कमी असणाऱ्या शहरांबाबत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. तसेच ज्याठिकाणी कोविड रुग्णसंख्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तिकडे कोवीड निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेतही दिले होते. त्यानूसार आज केडीएमसी आयुक्तांनी हे नविन निर्बंध लागू केले आहेत. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून लागू होणार हे निर्बंध 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. 

असे आहेत नविन निर्बंध...

  • सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. 
  • अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल. 
  • दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार.  
  • कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल. 
  • कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. 
  • दुपारी 2 नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे 2 नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 
  • अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने ( मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.  
  • अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार. 
  • यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील. 
टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे