केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर
By मुरलीधर भवार | Updated: April 19, 2023 19:49 IST2023-04-19T19:48:42+5:302023-04-19T19:49:06+5:30
या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे.

केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर
कल्याण- देशाच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देशातील स्मार्ट सिटीमध्ये फ्रीडम टू वाॅक, सायकल आणि रन ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे.
देशातील एकूण ३१ शहरांनी सहभाग घेतला हाेता. १ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२३ या ४५ दिवसांच्या कालावधीत आयाेजित स्पर्धेत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रेय शिंदे, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी प्रल्हाद राेडे,उपायुक्त सुधाकर जगताप, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहाय्यक अभियंता अजित देसाई, उद्यान अधिक्षक अनिल तामाेरे, सहाय्यक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील, पाेलिस निरिक्षक उमेश गीते, सहाय्यक पाेलिस निरिक्षक अनिल गायकवाड, नितीन सूर्यवंशी हे अधिकारी सहभागी झाले हाेते.
या स्पर्धेत चालणे (२,०३६ किमी), धावणे (१,४८३ किमी), सायकलींग (८,२५४ किमी) या तीनही प्रकारात देश पातळीवर केडीएमसी सेकंड विनर ठरली. तर वैयक्तीक कामगिरीत सहाय्यक अभियंता अजित देसाई यांनी धावण्यामध्ये प्रथम क्रमांक (एकूण ११४३ किमी) पटकावला आहे. तर सायकलींग मध्ये अतिरिक्त आयुक्त पोलीस दत्तात्रेय शिंदे यांनी तृतीय क्रमाक (४७५० किमी) मिळविला आहे.
उद्यान अधिक्षक अनिल तामोरे यांनी चालण्यामध्ये 'तृतीय क्रमांक' (९८७ किमी) पटकावला असून एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी चालण्यामध्ये देश पातळीवर ७ वा क्रमांक (५५६ किमी) तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सुर्यवंशी यांनी सायकलींगमध्ये ५ वा क्रमांक' (१६८१ किमी) आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सायकलींगमध्ये ९ वा क्रमांक (११४८ किमी) मिळविला आहे.
गेल्या वर्षी फ्रीडम टू वाॅक या स्पर्धेत केडीएमसी फर्स्ट विनर ठरली हाेती.