शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:39 AM

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते.

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिने १० दिवसांत ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही लाट १५ मे नंतर ओसरणार असली तरी पुन्हा जुलै, ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते. मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. जुलै २०२० मध्ये एका दिवसात ६६४ रुग्ण आढळले होते. दिवाळीनंतर रुग्णसंख्या घटू लागली होती. जानेवारीत पहिली लाट ओसरल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, १७ फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज एक ते दोन हजारांच्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता, पुरवठ्याच्या ऑडिटसाठी पथके नेमली गेली. मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत होती. त्यामुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

प्रशासनाची तयारी सुरू - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे विभा कंपनीच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयात ५० टक्के बेड मुलांसाठी आरक्षित ठेवले जाणार आहेत, तसेच मुलांसाठी आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे.- रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बालरोगतज्ज्ञ आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयास प्रत्येकी दोन असे चार बालरोगतज्ज्ञ भरती केले जाणार आहेत. दोन्ही रुग्णालयांत १० बेड मुलांसाठी असतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस