शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांसाठी KDMC चं महत्वाचं पाऊल! डोंबिवलीत कोरोनाबाधित लहान मुलांसाठी 100 बेड राखीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:04 IST

केडीएमसी हद्दीत कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसतेय. तरीही भविष्यात  गंभीर स्वरूपाच्या  रूग्णांना  बेडसाठी धावाधाव करावी लागू नये याकरिता डोंबिवली एमआयडीसीमधील विभा कंपनीच्या जागेत केडीएमसी प्रशासनाकडून कोरोना रूग्णालय उभारल जात आहे.

केडीएमसी हद्दीत कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसतेय. तरीही भविष्यात  गंभीर स्वरूपाच्या  रूग्णांना  बेडसाठी धावाधाव करावी लागू नये याकरिता डोंबिवली एमआयडीसीमधील विभा कंपनीच्या जागेत केडीएमसी प्रशासनाकडून कोरोना रूग्णालय उभारल जात आहे. विशेष म्हणजे या  कंपनीच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर  कोरोना बाधित झालेल्या लहान  मुलांवर उपचार केले जाणार आहेत. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आयएमएच्या डॉक्टरांसोबत  विभा कंपनीच्या इमारतीत  कोरोना रुग्णालयाच्या सुरू असलेल्या कामाची नुकतीच पाहणी केली. येत्या दिवसात दुर्दैवाने लहान  मुलांचं बाधित  होण्याच प्रमाण वाढलं तर पालकांना धावपळ करावी लागू नये म्हणून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 580 बेडस चे हे रुग्णालय असणार आहे. यापैकी 100 बेड हे लहान मुलांसाठी असणार आहेत. यामध्ये एनआयसीयु  बेडचाही समावेश आहे. मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी वेगळी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. आयएमएच्या पीडयाट्रिक टास्क फोर्सन यासंदर्भात एक मेडिकल लॉजिस्टिक रिपोर्ट केडीएमसी प्रशासनाला दिलाय. या रिपोर्ट मध्ये लहान मुलांना लागणारी सुई, व्हेंटिलेटर, खाटा, आवश्यक असणारी औषध  इत्यादी माहितीचा समावेश असल्याच कल्याण आयएमएचे  अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी सांगितलं.सावित्रीबाई फुले नाट्यगृहापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  विभा कंपनीची जागा केडीएमसी प्रशासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. या  कंपनी अंतर्गतचे न्याय प्रविष्ठ प्रकरण मार्गी लागल असून अंतिम निकाली निघेपर्यंत ही जागा कल्याणडोंबिवली महानगरपालिकेला कोरोनां रूग्णांच्या वापरासाठी काही काळ द्यावी असे आदेश  उच्च न्यायालयाने  कंपनी प्रशासनाला दिलेत. ही जागा मिळवण्यासाठी केडीएमसी आयुक्त सूर्यवंशी हे प्रयत्नशील होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस