कल्याणमध्ये काँग्रेसची ढाेल ताशांच्या गजरात आतिषबाजी
By मुरलीधर भवार | Updated: May 13, 2023 22:57 IST2023-05-13T22:56:49+5:302023-05-13T22:57:30+5:30
"ये तो अभी झाकी है पुरा देश अभी बाकी है", कार्यकर्त्यांचा जल्लोष

कल्याणमध्ये काँग्रेसची ढाेल ताशांच्या गजरात आतिषबाजी
मुरलीधर भवार, कल्याण: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव आज सांयकाळी कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात आतिषबाजी करुन एकमेकांना पेढे भरवित आनंद साजरा केला.
कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह कांचन कुलकर्णी, शकील खान, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, प्रवीण साळवे, जपजीत सिंग रत्नप्रभा म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पोटे यांनी ये तो अभी झाकी है पुरा देश अभी बाकी है ही सुरुवात आहे. दक्षिणेतून भाजपला हद्दपार करण्याचे काम सर्वसामान्य जनतेने केले आहे. केरला स्टोरी सारखे पिक्चर आणून भाजप धार्मिक तेढ निर्माण करते मात्र आता लोक जागृत झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा पोटे यांनी केला आहे.