केडीएमसी मुख्यालयासमोर करहम फाऊंडेशनचे साखळी उपोषण सुरू
By मुरलीधर भवार | Updated: October 20, 2022 18:22 IST2022-10-20T18:19:55+5:302022-10-20T18:22:15+5:30
करहम फाऊंडेशनचे प्रमुख शकील खान आणि त्यांचे सहकारी प्रवीण भालेराव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अशोक गवळी यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

केडीएमसी मुख्यालयासमोर करहम फाऊंडेशनचे साखळी उपोषण सुरू
कल्याण - शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेवली असताना अद्याप बुजविण्यात आलेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या विरोधात आजपासून करहम फाऊंडेशनच्या वतीने मुख्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
करहम फाऊंडेशनचे प्रमुख शकील खान आणि त्यांचे सहकारी प्रवीण भालेराव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अशोक गवळी यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या दहा प्रभागात १३ कोटी रुपये खर्चाचा ठेका विविध ठेकेदारांना देऊन देखील त्यांच्याकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम झालेले नाही. या ठेकेदारांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी फाऊंडेशनच्या वतीने उपोषण करणाऱ्यांनी केली आहे. यापूर्वीही या फाऊंडेशनच्या वतीने सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत साखळी उपोषण केले आहे. त्यावेळी त्यांना प्रशासनाकडून आश्वासन दिले गेले होते. त्या आश्वासनाची पूर्तता केली गेली नसल्याने फाऊंडेशन पुन्हा उपोषण सुरू केले आहे.