अमृत योजनेतील प्रकल्पांच्या कामाची केंद्र सरकारच्या सहाय्यक सचिव पथकाकडून पाहणी
By मुरलीधर भवार | Updated: June 13, 2024 18:53 IST2024-06-13T18:52:40+5:302024-06-13T18:53:48+5:30
कामे केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना संबंधित अधिकारी वर्गास दिली आहे.

अमृत योजनेतील प्रकल्पांच्या कामाची केंद्र सरकारच्या सहाय्यक सचिव पथकाकडून पाहणी
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत अमृत दोन योजने अंतर्गत चार प्रकल्पांचे काम सुरू आहे . या प्रकल्पां कामाची करण्यासाठी केंद्र सरकारच्या हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मंत्रालयाचे सहाय्यक सचिव यशवंत रेड्डी यांच्या टीमने आज भेट देऊन पाहणी केली.
मोहीली येथील २७५ दश लक्ष लीटर क्षमतेचे उदंचन केंद्र बांधणे ,महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी जलकुंभ बांधणे व गौरी पाडा येथील ७५ दशलक्ष लिटरचे पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्राचे कामाची पाहणी केली. कामाची निकड आणि काम पूर्ण झाल्यानंतर महापालिका हद्दीतील नागरीकांनाी त्याचा काय उपयोग होणार आहे ? याची सखोल माहिती घेतली. सुरु असलेल्या कामाची तपासणी केली. कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ही कामे केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना संबंधित अधिकारी वर्गास दिली आहे. यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.