शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नवरीचा साज बाजूला ठेवत एसटीचा पाना हाती घेणारी पहिली ‘कल्पना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 09:10 IST

बदलापूर येथे राहणाऱ्या कल्पना यांनी १९९७ मध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, अंबरनाथ येथील आयटीआय येथून दोन वर्षांचा रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनरचा कोर्स पूर्ण केला.

- सचिन सागरे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : हातातील हिरवा चुडा उतरत नाही तोच जिद्द, मेहनत आणि चिकाटी याचा मेळ घालत राज्य परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी आगारातील तांत्रिक विभागाची जबाबदारी सांभाळण्याचा योग साधला आणि सहायक मेकॅनिक पदावर काम करण्यास सुरुवात झाली. नव्या नवरीचा साज दूर ठेवत जबाबदारीला प्राधान्य देत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कल्पना हेमंत निकम हे अवजड काम गेल्या १६ वर्षांपासून अविरतपणे करीत आहेत. एसटी विभागात कारागीर (क) पदावर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान कल्पना यांना मिळाला आहे.

बदलापूर येथे राहणाऱ्या कल्पना यांनी १९९७ मध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, अंबरनाथ येथील आयटीआय येथून दोन वर्षांचा रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनरचा कोर्स पूर्ण केला. नंतर वेगवेगळी कामे करताना २००२ मध्ये  एसटी महामंडळाचा कॉल आला. मुलाखत आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये विठ्ठलवाडी एसटी आगारामध्ये सहायक मेकॅनिक पदावर रुजू झाल्या. ज्या महिन्यात लग्न झाले त्याच महिन्यात त्यांना कामावर रुजू व्हावे लागले. 

२०२२ मध्ये त्यांनी कारागीर (क) या पदावर काम केले. या ठिकाणी इंजिन सेक्शन सांभाळण्याबरोबरच आरटीओ पासिंगची कामे केली. दोन महिन्यांपूर्वी कल्याण आगारात त्यांची बदली झाली. हे काम करीत असताना अवजड वाहन चालविण्याचा परवानाही त्यांनी मिळविला. चालकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्या स्वतः एसटी चालवतात. 

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

विमान चालविण्याचे स्वप्नक्रिकेट, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, खो-खो, कबड्डी या खेळांत प्रावीण्य मिळवले असून याच खेळांच्या जोरावर हे शिवधनुष्य लीलया पेलत असल्याचे कल्पना यांनी सांगितले. एसटी बससह विविध प्रकारची वाहने, तसेच जहाज चालवणाऱ्या कल्पना यांनी विमान चालविण्याचे स्वप्न असल्याचे आवर्जून सांगितले

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवातीला कुटुंबाचा विरोध होता; पण हळूहळू त्यांचा विरोध मावळला. वडील वरळी येथील एका कंपनीत हाय स्टील मेकॅनिक असल्याने सुरुवातीपासूनच त्याचे सहकार्य मिळाले. त्यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली. - कल्पना निकम, कल्याण एसटी आगार

टॅग्स :Navratriनवरात्री