श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे कलश यात्रेला कल्याणमध्ये शुभारंभ
By अनिकेत घमंडी | Updated: December 30, 2023 18:21 IST2023-12-30T18:20:42+5:302023-12-30T18:21:02+5:30
श्रीराम जन्मभूमी आयोध्या मधून गर्भगृहामधे पूजन केलेला मंत्रवत अक्षतांचा कलश आपल्या प्रताप नगरात आला आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे कलश यात्रेला कल्याणमध्ये शुभारंभ
डोंबिवली: श्रीराम जन्मभूमी आयोध्या मधून गर्भगृहामधे पूजन केलेला मंत्रवत अक्षतांचा कलश आपल्या प्रताप नगरात आला आहे. त्या निमित्त कलश स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कलश यात्रा शनिवारी डीमार्ट जवळील राम मंदिर, बैल बाजार येथून निघाली, त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कलश स्वागत यात्रा डीमार्ट जवळील राम मंदिर - शिवाजी चौक मार्गे - शंकरराव चौक - अहिल्याबाई चौक - टिळक चौक - पारनाका राम मंदिर मार्गे - गांधी चौक - घेला देवी चौक मार्गे जाईल तेथून सुभाष मैदाना जवळील हनुमान मंदिर येथे समारोप झाला. सकल राम भक्त हिंदू समाजने कलशाच्या स्वागत यात्रेसाठी आणि पुजनासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच १ ते १५ जानेवारी घरोघरी जाऊन अक्षता आणि आमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी आपल्या वस्तीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यावेळी करण्यात आले.