कल्याणमध्ये भाजप शिंदेसेना पदाधिकाऱ्यांचा जल्लोष; शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी
By सचिन सागरे | Updated: June 9, 2024 22:42 IST2024-06-09T22:42:00+5:302024-06-09T22:42:13+5:30
शिंदेसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

कल्याणमध्ये भाजप शिंदेसेना पदाधिकाऱ्यांचा जल्लोष; शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी
कल्याण : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याने भाजप आणि शिंदेसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कल्याणमध्ये देखील भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
शिंदेसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी प्रत्येक शाखेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.