कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत

By सचिन सागरे | Published: April 4, 2024 04:21 PM2024-04-04T16:21:32+5:302024-04-04T16:22:03+5:30

गेल्या काही वर्षांपासून कल्याण सारख्या शहरी भागातील तरुणांना कुस्ती या पारंपारिक मातीच्या खेळाकडे पुन्हा वळवण्याचे काम केले आहे.

Jitendra Bhagat as the President of the Wrestling Federation | कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत

कल्याण :कल्याणमधीलकुस्तीगीर पैलवान जितेंद्र भगत यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या कल्याण डोंबिवली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सापर्डे गावाचे रहिवासी असलेल्या भगत यांनी गेल्या काही वर्षांपासून कल्याण सारख्या शहरी भागातील तरुणांना कुस्ती या पारंपारिक मातीच्या खेळाकडे पुन्हा वळवण्याचे काम केले आहे. कल्याण, डोंबिवलीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात विविध कुस्ती स्पर्धा आयोजित करून तरुणांमध्ये कुस्तीचा प्रसार केला. त्यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पातळीवरील कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अध्यक्ष पैलवान गणेश मानुगडे यांनी त्यांच्यावर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत कुस्तीगीर म्हणून या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. महासंघाने दिलेल्या जबाबदारी नंतर आता होतकरू तरुणांना कुस्तीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम यापुढील काळात जोमाने करू, असे पैलवान भगत यांनी सांगितले.

Web Title: Jitendra Bhagat as the President of the Wrestling Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.