'जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेताहेत'; डोंबिवली शिवसेनेकडून निषेध

By मुरलीधर भवार | Updated: June 6, 2023 15:52 IST2023-06-06T15:51:52+5:302023-06-06T15:52:06+5:30

-दिघे साहेबांची सणसणीत कानाखाली खाल्लेला जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

'Jitendra Awhad avenges his insult Dombivli protests by Shiv Sena | 'जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेताहेत'; डोंबिवली शिवसेनेकडून निषेध

'जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेताहेत'; डोंबिवली शिवसेनेकडून निषेध

डोंबिवली-दिघे साहेबांची सणसणीत कानाखाली खाल्लेला जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच आव्हाड यांनी शरद पवार यांच्यामुळे आनंद दिघेची जेलमधून सुटका झाली असे विधान केल्याचा आरोप शिवसेना उपिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला .

डोंबिवली शिवसेना शहर शाखा कार्यालयात पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यचा निषेध शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

जितेंद्र आ्व्हाड यांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांची टाडातून सुटका झाली असे विधान केले होते. याबाबत बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड.यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शिल्लक सेना असा उल्लेख करत धर्मवीर आनंद दिघे यांचे शिकवण तुम्ही सोडली.

मुस्लिम धार्जिने धर्माचे राजकारण करतात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही राजकारण करता. कुठेतरी तुम्ही लाज बाळगली पाहिजे.तुम्ही जाहीर निषेध करा असा आव्हान देखील उद्धव ठाकरे गटाला यावेळी करण्यात आले. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे पुन्हा असे वक्तव्य केले तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील शिवसेना शिंदे गटाकडून दिला.

Web Title: 'Jitendra Awhad avenges his insult Dombivli protests by Shiv Sena