शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"दिवाळी होती, लोकांच्या घरात कंदील लागले होते अन्..."; मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:30 IST

राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली.

कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. दिवा शहरातील पायाभूत सुविधा आणि इथल्या अधिकाऱ्यांच्या हप्तेबाजीवर निशाणा साधत दिव्याचे सिंगापूर करणार होते या गोष्टीची देखील त्यांनी आठवण करून दिली. त्याचप्रमाणे येथील पुलाच्या कामासाठी ऐन दिवाळीत लोकांच्या घरी कंदील लागले असताना त्यांना बेघर करण्यात आलं यावर सुद्धा पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली.     दिवा विभाग ठाणे महापालिकेमध्ये येतो की नाही अशी शंका येते. पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरात हॉस्पिटल, गार्डन, पोलीस स्टेशन नाही. साधं शौचालय देखील नाही. आमदार झाल्यापासून आपण या गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासन आणि शासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिवा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं काम रखडलं  आहे. त्याचं भूसंपादन न करता टेंडर काढून पुलाचं काम सुरू करण्यात आले होते.

राहती घरे, व्यवसायिक गाळे तोडण्यात आले. ऐन दिवाळीत लोकांच्या घरी कंदील लागले असताना त्यांना बेघर करण्यात आला. ते लोक रस्त्यावर आले. ठाणे महानगरपालिका हम करे सो कायदा या भूमिकेत आहे. त्यांना कुणाचं काही पडलं नाही. आता हा उड्डाणपूल असाच लटकलेला आहे. हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे दिव्याचा रेल्वे फाटक बंद होणार आहे. थेट खरेदीने भूसंपादन करा आणि शेतकऱ्यांना मोबदला द्या आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. अन्यथा दहा वर्षे हा पूल काही होणार नाही असंही ते आवर्जून म्हणाले.

दिव्याचा सिंगापूर होणार, पण कधी?

 महापालिकेकडून जाहिरातबाजी करण्यात आली होती की दिव्याचं सिंगापूर केलं जाईल. परंतु क्लस्टरचा इथे  काहीच पत्ता नसून त्यात अजून अनधिकृत बांधकामही सुरू आहे. दिवा शहरांमध्ये करोडोची कामे झाली की भ्रष्टाचार झाला याचा ऑडिट झालं पाहिजे अशी आग्रही मागणी राजू पाटील यांनी केली. 

अधिकाऱ्यांची हप्तेबाजी 

दिवा रेल्वे स्टेशनची परिस्थिती अत्यंत खराब आहे. तिथे चालायला जागा नाही. फेरीवाले ,रिक्षा त्यातच खाजगी गाड्या अशी अवस्था स्टेशन परिसरात आहे . इथल्या फेरीवाल्यांनी वार्ड ऑफिसरला सुद्धा मारहाण केली होती. इथले वार्ड अधिकारी फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांकडून हप्ते गोळा करतात असा आरोप देखील पाटील यांनी केला. यावर काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे नालेसफाईचं ऑडिट करणे देखील गरजेचे आहे या मुद्द्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेdivaदिवा