5 वर्षीय इसहात इद्रीसीला मदत मिळाल्याने त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर झाली शस्त्रक्रिया
By मुरलीधर भवार | Updated: April 1, 2023 16:19 IST2023-04-01T16:18:34+5:302023-04-01T16:19:55+5:30
इसहात हा कल्याणमध्ये राहताे. त्याची घरची परिस्थिती बिकट आहे

5 वर्षीय इसहात इद्रीसीला मदत मिळाल्याने त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर झाली शस्त्रक्रिया
कल्याण-कल्याणमधील इसहात इद्रिसी या पाच वर्षाच्या मुलाच्या पडजिभेला छिद्र असल्याने त्याला बाेलायला आणि जेवायला त्रास हाेता. त्याच्या मदतीसाठी मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम धावले. त्यांनी त्याला मदत उपलब्ध करुन दिल्याने मुंबईतील वाडिया रुग्णालयात त्याच्या पडजिभेवरील छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे इसहातला माेठा दिलासा मिळाला आहे. ताे आत्ता बाेलू शकताे.
इसहात हा कल्याणमध्ये राहताे. त्याची घरची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नाहीत. ही समस्या घेऊन त्याचे वडिल निकम यांच्याकडे आले. सरकारच्या महात्मा ज्याेतिबा फुले याेजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. त्याकरीता उत्पन्नाचा दाखला मुलाच्या वडिलांकडे नव्हता. कल्याण तहसील कार्यालतील तलाठी किरण कदम यांनी २४ तासाच्या आत दाखला उपलब्ध करुन दिला. त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करुन मुंबईतील रुग्ण मित्र पंकज ठाकरे यांनी सुद्धा मदत केली. त्यामुळे शस्त्रक्रियेचा मार्ग माेकळा झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्याने ताे आत्ता बाेलू शकताे. त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून निकम यांनी समाधान व्यक्त केले आहे.