कल्याण: कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुलाचं उद्घाटन केलं. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पुलाच्या उद्घाटनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पत्र पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.१९१४ मध्ये बांधण्यात आलेला पत्री पूल बांधण्यात आला. एक दशकापेक्षा अधिक काळ या पुलावरून वाहतूक सुरू होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये पत्री पूल पाडण्यात आला. वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागल्यानं नव्या पुलाचं बांधकाम सुरू झालं. अखेर दोन वर्षांनंतर या पुलाचं काम पूर्ण झालं. ग्लोबल स्टील हैद्राबादनं पत्री पूल बांधला आहे.
पत्री पुलाचं नाव पत्री पूल कसं पडलं माहित्येय का?; जाणून घ्या रंजक गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:04 IST