शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश: तिघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:21 IST

डोंबिवली पोलिस ठाण्याची कारवाई

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेेटवर्कडोंबिवली: एकिकडे सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असताना अशा गुन्हयातील आंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्हयातील तीन आरोपींना बेडया ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरलेल्या सोनसाखळींसह गावठी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे आणि एक दुचाकी असा तीन लाख ८० हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

३ सप्टेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास ठाकुर्ली ९० फुटी रोडवरील चामुंडा सोसायटी गेट जवळून एक वृद्ध महिला जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटयांनी तीच्या गळयातील सोन्याचा ऐवज खेचून ते पळून गेल्याची घटना घडली होती. या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, डोंबिवली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अच्युत मुपडे आणि पोलिस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, पोलिस हवालदार सुनिल भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनवणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे आदिंची दोन पथके नेमली होती.

अभय सुनिल गुप्ता (वय २१) अभिषेक ओमप्रकाश जौहरी ( वय ३२) आणि अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला ( वय २७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुळचे उत्तरप्रदेशमधील कुमारनटोला, हरीहरगंज आणि खमरीया इथले रहिवाशी आहेत.

१०६ सीसीटिव्ही तपासलेगुन्हयाच्या तपासकामी पोलिसांनी तब्बल १०६ सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. चोरांनी गुन्हा करताना दुचाकी वापरल्याचे यामध्ये निष्पन्न झाले. दुचाकीच्या नंबरवरून संबंधित मालकाला संपर्क केला असता दुचाकी चोरीला गेल्याची माहिती त्याच्याकडून पोलिसांना मिळाली.

पुण्यात दुचाकी चोरली

आणि डोंबिवलीत सोनसाखळी चोरीगुन्हयात वापरलेली दुचाकी २२ ऑगस्टला पुण्यातील नारायण पेठेतून चोरली होती. याप्रकरणी दुचाकी मालकाने स्थानिक विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चोरटयांनी दुचाकीचा वापर डोंबिवलीत सोनसाखळी चोरण्यासाठी केला. दरम्यान चोरटे डोंबिवली पुर्वेकडील सुनिल नगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तिघा आरोपींना सापळा लावून अटक करण्यात आली.

पिस्तुल, काडतुसे आढळली

पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता अभय गुप्ता आणि अभिषेक जौहरी यांच्याकडे गावठी पिस्तुल आणि चार काडतुस आढळली.

उत्तरप्रदेशमध्ये खूनाचा गुन्हा

आरोपीवर गुप्ता आणि डोंबिवली आणि मानपाडा पोलिस ठाणे, पुण्यातील विश्रामबाग, बिवेवाडी, हडपसर येथे तर उत्तरप्रदेश मधील हारगाव, कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये १३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी अर्पित उर्फ प्रशांत याच्याविरोधात उत्तरप्रदेश येथे खूनाचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली