भारतीय तायक्वांदोला सुगीचे दिवस, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले
By मुरलीधर भवार | Updated: March 18, 2024 16:31 IST2024-03-18T16:31:26+5:302024-03-18T16:31:45+5:30
चीन येथे झालेल्या पॅराऑलम्पिक निवड चाचणी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावून पॅरिस ओलंपिक २०२४ चे तायक्वांदो खेळाला दार उघडले आहे.

भारतीय तायक्वांदोला सुगीचे दिवस, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले
कल्याण- भारतामध्ये गेल्या ५० वर्षापासून तायक्वांदो हा खेळ खेळला जातो. सर्व शासकीय दरबारी या खेळाचे स्पर्धा आणि प्रशिक्षण वर्ग चालवले जातात परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पासून कोसो दूर असणारा भारतीय तायक्वांदो संघाची खेळाडू अरुणा तनवर (हरियाणा) हिने चीन येथे झालेल्या पॅराऑलम्पिक निवड चाचणी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावून पॅरिस ऑलंपिक २०२४ चे तायक्वांदो खेळाला दार उघडले आहे.
तिच्या या कामगिरीचे संपूर्ण भारतभर कौतुक होत आहे. याचा सर्व श्रेय इंडिया तायक्वांदो अध्यक्ष नामदेव शिरगावकर, कोरिया आणि भारतीय तायक्वांदो समन्वयक किराश बेहरी, तामचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफार पठाण यांना जाते.
अध्यक्ष शिरगावकर यांनी सांगितले की, चायना येथील कॉलिफिकेशन निवड चाचणी स्पर्धेमध्ये अरुणा तनवर या खेळाडूंनी केलेली कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक कामगिरी असून यासाठी आपणास पन्नास वर्षे वाट पहावी लागली आता यापुढे तायक्वांदो खेळाला सुगीचे दिवस येणार आहेत. मिशन ओलंपिक हा प्रोजेक्ट आम्ही प्रत्येक राज्यात राबवणार आहो.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष झोडगे म्हणाले की, ऑलम्पिक मध्ये तायक्वांदो प्रवेश हे खरंच आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सचिव ओंबासे यांच्या मते, आयुष्यभर ज्या खेळासाठी आपण मेहनत घेतली त्या खेळाला मिळालेले यश पाहून उर भरूआला. हे यश कौतुकास्पद तायक्वांदोचे भारतामध्ये बदललेले स्वरूप हे यातून अधोरेखीत होते.