कल्याणमधील लालचौकी परिसरात आढळला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा

By सचिन सागरे | Updated: August 6, 2023 16:22 IST2023-08-06T16:21:36+5:302023-08-06T16:22:21+5:30

बदलत्या वातावरणामुळे ठिकठिकाणी साप बाहेर पडत आहेत व लोकांच्या घरात व इमारतींमध्ये शिरण्याचे  प्रकार वारंवार घडत असतात असाच एक प्रकार कल्याणमध्ये घडला.

Indian Spectacle Cobra found in Lalchowki area of Kalyan | कल्याणमधील लालचौकी परिसरात आढळला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा

कल्याणमधील लालचौकी परिसरात आढळला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा

कल्याण : बदलत्या वातावरणामुळे ठिकठिकाणी साप बाहेर पडत आहेत व लोकांच्या घरात व इमारतींमध्ये शिरण्याचे  प्रकार वारंवार घडत असतात असाच एक प्रकार कल्याणमध्ये घडला.

पश्चिमेकडील लालचौकी परिसरात एका घरात पाच फुटाचा भारतीय नाग म्हणजेच, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा जातीचा नाग आढळून आला. या नागाला पाहून कुटुंबाने घराबाहेर धाव घेतली. वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राणी मित्र योगेश कांबळे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी सर्पमित्र सतीश बोबडे यांना संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच बोबडे घटनास्थळी दाखल झाले. घरातील कपाटाच्या मागे लपलेल्या नागाला पकडले.

पकडण्यात आलेला हा नाग वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निसर्ग मुक्त करण्यात येईल अशी माहिती सर्पमित्र बोबडे यांनी दिली.

Web Title: Indian Spectacle Cobra found in Lalchowki area of Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.