VIDEO: कल्याणमध्ये इमारतीमधील एका घराला आग; घरातील सामनाचं मोठं नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 16:14 IST2020-11-17T16:14:27+5:302020-11-17T16:14:39+5:30
अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली

VIDEO: कल्याणमध्ये इमारतीमधील एका घराला आग; घरातील सामनाचं मोठं नुकसान
कल्याण: कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील टेकडीवरील एकोरिना -कॅसोरीना या सोसायटीतील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका घराला मंगळवारी दुपारी आग लागली. बेडरूममध्ये असणाऱ्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ती संपूर्ण घरात पसरली. आग लागली तेव्हा घरामध्ये काही सदस्यही उपस्थित होते. आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करीत संपूर्ण घराला विळखा घातला.
कल्याण पश्चिमेतल्या गोदरेज हिल परिसरातील एकोरिना-कॅसोरिना सोसायटीतल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराला आग https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/wgr4BcRPk3
— Lokmat (@MiLOKMAT) November 17, 2020
आग एवढी मोठी होती की घराच्या गॅलरीतून वरच्या गॅलरीपर्यंत पसरू लागली. मात्र अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने ही आग इमारतीमध्ये पसरू शकली नाही. दरम्यान त्याठिकाणी असणारी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याची माहितीही समोर येत आहे. ज्यामुळे या आगीमध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले. याबाबत आपल्या विभागाकडून संबंधित सोसायटीला नोटीस बजवणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.