शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:52 IST

मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात मतदारांचे ठिय्या आंदाेलन

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८४ हजार मतदार असून, जवळपास एक लाख मतदारांची नावे बाद करण्यात आली. मतदार यादीत मृत मतदारांची नावे होती, तर जिवंत मतदारांची नावे गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने मतदार संतापले. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रावर मतदारांनी ठिय्या मांडला. यामुळे काही काळासाठी मतदान प्रक्रिया मंदावली. संतोषी माता रोड परिसरात राहणारे अतुल फडके हे १९८४ पासून मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यांच्या घरातील अन्य सर्व सदस्यांची नावे यादीत होती. मात्र, अतुल यांचे नाव गायब होते. गायकर पाडा येथे राहणारे धर्मेंद्र भट आणि त्यांच्या पत्नीचे मतदार यादीत नाव नव्हते. त्याचबरोबर, ६० जणांची नावे यादीतून गायब होती. कल्याणच्या जोशी बागेत राहणारे डॉ. विनाेद पंजाबी यांचे नाव मतदार यादीत होते. मात्र, त्यांच्या मतदार ओळखपत्रावर त्यांच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यापासून रोखण्यात आले.

... अन् अधिकारी निरूत्तरउद्धवसेनेचे पदाधिकारी नीलेश भोर यांच्यासह पक्षाचे संघटक रवींद्र कपोते यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता, त्यांनी यादीत नाव नसलेल्यांना सहा नंबरचा अर्ज भरून द्यावा. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत येईल. मात्र, मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्याचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हते.

९२ वर्षीय आजीचे मतदानमोहिंदरसिंग काबूल सिंग शाळेतील मतदान केंद्रावर ९२ वर्षांच्या सुहासिनी पानसरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. ८९ वर्षीय प्रभाकर पाठक हे पक्षाघाताने आजारी असतानाही त्यांनी मतदान केले. 

महिलेच्या नावाने केले मतदान कल्याण पश्चिमेतील प्रियांका कुलकर्णी या बाजारपेठ परिसरात राहतात. त्या मतदानाला गेल्या असता, त्यांच्या नावावर अन्य कुणी मतदान केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना धक्का बसला.

हक्क न बजावता औरंगाबादला उंबर्डे परिसरातील ५३ वर्षीय प्रकाश काऊतकर हे वाहनचालक आहेत. ते कामानिमित्त औरंगाबादला राहतात. नाव नसल्याने केंद्रावर पोहोचताच त्यांच्या पदरी निराशा आली. मतदानाचा हक्क न बजावताच त्यांना औरंगाबादची गाडी पकडावी लागली.

माजी आयुक्तांचे मतदान केडीएमसीचे माजी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कल्याण लोकसभेत मतदानाचा हक्क बजावला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४kalyanकल्याणVotingमतदान