लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला कारावास

By सचिन सागरे | Updated: May 2, 2023 19:05 IST2023-05-02T19:04:52+5:302023-05-02T19:05:05+5:30

अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या भावाकडे आरोपी राहत होता.

Imprisonment for sexual assault uncle | लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला कारावास

लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला कारावास

कल्याण: तेरा वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी मंगळवारी पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या भावाकडे आरोपी राहत होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये आरोपीने पुतणीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या बहिणीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात काकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अंबरनाथ पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील जयश्री भटिजा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोलीस हवालदार भालचंद्र पवार यांनी त्यांना मदत केली.

Web Title: Imprisonment for sexual assault uncle