मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कारावास
By सचिन सागरे | Updated: June 27, 2024 15:15 IST2024-06-27T15:14:53+5:302024-06-27T15:15:22+5:30
कल्याण न्यायालयाचा निकाल

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शशिकांत रामभाऊ सोनवणे याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हरणे यांनी पॉक्सो कलमांतर्गत दोषी ठरवत वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सन २०१७ मध्ये आरोपी शशिकांत याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीतेच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश संभाजीराव जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विद्या एस. सूर्यवंशी यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अश्विनी भामरे - पाटील व के. एम. खंडागळे यांनी कामकाज पाहिलेले. त्यांना कोर्ट पैरवी महिला पोलीस हवालदार तेजश्री ज. शिरोळे व पोलीस नाईक बी. एम. चव्हाण यांनी मदत केली.