शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

कल्याण-डोंबिवलीत पाेलिसांकडून कडक संचारबंदीची अंमलबजावणी; कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:34 IST

कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण : मोकाट फिरणाऱ्यांची पोलीस ठाण्यात वरात; गर्दुल्ले, मद्यपींना लगाम गरजेचा

मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाकाळातील सगळ्य़ात कडक असलेली बंदी अनलॉकमध्ये शिथिल झाली होती. मात्र, पुन्हा नववर्षाच्या आगमनाला लोक बाहेर पडणार, पुन्हा कोरोनास आमंत्रण देणार. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा नवा जनुकीय स्ट्रेन्स पाश्चिमात्य देशात आढळल्यावर पुन्हा तो नव्या रूपात पसरू शकतो. त्याला आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. 

रात्री ११नंतर यासाठी पोलिसांची विशेष तपासणी सुरू आहे. रस्त्यावर पाचपेक्षा जास्त लोक ११नंतर दिसून आल्यावर त्यांना दंडुक्याने ठोकून काढण्याचा शिरस्ता पोलिसांनी सुरू ठेवला. त्याचबरोबर कामावरून उशिरा परतणाऱ्या चाकरमान्यांनाही या संचारबंदीचा फटका बसत आहे. ११नंतर कामावरून घरी परतणाऱ्यांना संचारबंदीला तोंड द्यावे लागत आहे. ओळखपत्र आणि सबळ कारण सांगितल्याशिवाय पोलिसांच्या तावडीतून रात्री परतणाऱ्यांची सुटका होत नाही.  सबळ कारण दिले गेले नाही तर पोलीस दुचाकीचालक असो की चार चाकी वाहन त्यांची चावी जमा करून त्यांना शिक्षा देत आहेत. मोकाट फिरणाऱ्यांना थेट पोलीस स्टेशनला नेले जाते. यामुळे ११ नंतर मोकाट फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे.

डोंबिवली औद्योगिक वसाहत डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४५० कारखाने आहेत. तेथे तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या जवळपास एक लाखांच्या घरात आहे. सध्या अनलॉकमध्ये कारखाने जोमात सुरू झाले आहेत. मात्र, सध्या रात्री ११ नंतर संचारबंदी लागू असल्याने सेकंड शिफ्ट करून सुटणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मानपाडा परिसरातील पोलीस बंदोबस्ताला कामगारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कामगारांनी सेकंड शिफ्टची वेळ बदली करा, अशी मागणी केली आहे.

कल्याणमधील लक्ष्मी मार्केटकल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये तब्बल ४०० फळ-भाजीपाला विक्रेते आहेत. हा परिसर दाटीवाटीचा आहे. लाॅकडाऊमध्ये तब्बल नऊ महिने हे मार्केट बंद होते. अनलॉकमध्येही ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी नव्हती. ते काही अटीशर्थींवर सुरू केले असले तरी आता त्याला पुन्हा संचारबंदीच्या नियमाचा फटका बसला आहे. रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेले मार्केट आता साडेनऊ वाजताच सामसूम होते. संचारबंदीमुळे ग्राहक लवकर येऊन भाजी घेऊन घरी जातात. 

महात्मा फुले चौक कल्याण रेल्वे स्थानकाजवळच महात्मा फुले चौक आहे. तेथे न्यायालय, सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. मात्र, या चौकात संचारबंदीचा धाक नाही. कारण पुतळ्याच्या शेजारीच कल्याणमधील नशाबाजांचा अड्डा बनला आहे. त्या ठिकाणी पुतळ्याला नशाबाजांनी घेरले आहे. काही दारुडे स्टेशन परिसरातील दुकानाचा आसरा घेतात. त्यात गर्दुल्ल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे रात्री घरी जाणाऱ्या सामान्यांना या लाेकांचा त्रास सहन करावा लागताे.

 छत्रपती शिवाजी महाराज चौकछत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षाचालकांचे स्टॅण्ड आहेत. त्या ठिकाणी ११ नंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत ते दिसून येतात. तसेच चौकात मटका कुल्फीवाल्यांच्या गाड्या असतात. त्या रात्री ११नंतरही लागलेल्या पाहावयास मिळतात. अवजड वाहनांची येजाही सतत सुरू असते. त्यामुळे शिवाजी चौक हा ११नंतर सामसूम होत नाही. दहा टक्के वर्दळ सुरूच असल्याचे पाहावयास मिळते. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस