शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते; आम्ही चुकलो असतो तर माफी मागितली असती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:41 IST

मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया

कल्याण- मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना प्रवेशानंतर कदम यांनी त्यांच्या फेसबूकवर मला माफ करा अशी भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर ते चुकले म्हणून त्यांनी माफी मागितली आहे. आम्ही चुकलो असतो तर आम्ही माफी मागितली असती, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

कदम यांच्या प्रवेशानंतर मनसे आमदार राजू पाटील यांच्या पलावा येथील कार्यालयात मनसेचे शेकडो कार्यकर्ते सायंकाळी जमले. त्यांच्यासोबत राजू पाटील यांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीपश्चात पत्रकारांशी बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेत जाणाऱ्यांची काही मजबूरी असेल. इतर काही आमिषांना ते बळी पडले असतील. ही दुदैवी गोष्ट आहे. त्यांचे घरगूती प्रश्नही त्याला जबाबदार असू शकतात, असंही राजू पाटील यांनी सांगितले.

राजू पाटील पुढे म्हणाले की, राज ठाकरेंवर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांच्या जाण्याचे नेमके कारण आम्हाला माहिती नाही. तरी देखील कारण आम्ही शोधून काढू. निवडणूका आल्या की, साम, दाम, दंड आणि भेद याचा वापर करुन आपल्या पदरात काही पक्षातील लोक पाडून घ्यायचे त्याचा हा पक्ष प्रवेश असेल, अशी टीकाही राजू पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर केली आहे.

कोरोना काळात कल्याण लोकसभा मतदार संघात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता सामान्यांसाठी काम केले. शिवसेना भाजपाची युती तुटलेली आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन खचली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षातील काही कार्यकर्ते फोडून जमवाजमव केली असेल. मला नाही वाटत आगामी काळात त्याचा आम्हाला काही फरक पडेल. जे व्हायचे ते होणारच,असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाRaju Patilराजू पाटील