शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:49 IST

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

कल्याण- केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या आधारे कोरोना लसीचे डोस राज्याला आणि विविध महापालिकाना पुरविले जात आहेत. मात्र लसीचे डोस पुरेशे येत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट कशी रोखायची असा सवाल कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केंद्राकडून राज्य आणि महापालिकांना जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध व्हावे अशी मागणी खासदार शिंदे यांना केली आहे. 

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. लोकसंख्येचे आधारे लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जातात. कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या जास्त आहे. राज्यातील मुंबई एमएमआर रिजन हे सगळयात मोठी नागरी वसाहत आहे. त्याची लोकसंख्या पाहता एमएमआर रिजनसह राज्याला जास्तीत जास्त लसीचे डोस केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजेत.

जानेवारी महिन्यापासून लसीकरण देशभरात सुरु झाले. सुरुवातीला लसीचे डोस केंद्र सरकारकडून पुरविले जात होते. मात्र आत्ता मध्यंतरीच्या काळात लसीकरण सातत्याने बंद ठेवण्याची वेळ विविध महापालिकांवर येत आहे. त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेतील लसीकरण पाच ते सात दिवस बंद होते. तज्ञांच्या मते देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. तिस:या लाटेची शक्यता असताना लसीचे डोस पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. तर तिसरी लाट रोखणार कशी असा प्रश्न आहे याकडे खासदार शिंदे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. केंद्राने मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करुन दिल्यास जास्तीत लोकांचे लसीकरण होऊ  शकते. हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने गेतला पाहिजे असे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस