शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरकर विनाअनुदानित झाले तर फी सवलत बंद, आगरी समाजासह कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 08:00 IST

Pendharkar College News: पेंढरकर पदवी कॉलेज विनाअनुदानित करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. ज्युनिअर कॉलेज विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव सरकारने नामंजूर केला आहे. त्याविरोधात कॉलेजने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 डोंबिवली - के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असल्यामुळे डोंबिवली परिसरातील ओबीसी प्रवर्गातील आगरी समाजाच्या विद्यार्थ्यांना  तसेच एमआयडीसी परिसरातील गोरगरीब कामगारांच्या मुलांना फीमध्ये सवलत मिळते. कॉलेज विनाअनुदानित झाले तर फी सवलत बंद होईल, तसेच प्राध्यापकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.पेंढरकर पदवी कॉलेज विनाअनुदानित करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. ज्युनिअर कॉलेज विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव सरकारने नामंजूर केला आहे. त्याविरोधात कॉलेजने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या २० जून रोजी सुनावणी अपेक्षित आहे. अनुदानित तुकड्यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळते. आर्थिकदृष्ट्या मागास, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फीमध्ये सूट मिळते. 

हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक फटका?- डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरात एमआयडीसी आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची मुले या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. तसेच आगरी समाज या भागात राहतो. हा समाज ओबीसी प्रवर्गात आहे. त्यांची मुले शैक्षणिक सवलत घेतात. त्यांच्या या सवलतीवर गदा येईल, असे म्हटले जाते. - कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या शिक्षणापेक्षा जास्त फी अन्य व्यवसायाभिमुख अभ्यास शाखांची आहे. अनुदानित डिग्री कॉलेजमध्ये दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. अनुदानित जुनिअर कॉलेजमध्ये १२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना फी सवलतीचा लाभ मिळतो. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना विनाअनुदानित कॉलेजचा आर्थिक फटका बसेल, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

८ हजार ४२२ रुपये फी वसूल सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात वाणिज्य शाखेच्या ११ वीची फी ६ हजार २७८ रुपये आकारण्यात आली. वाणिज्य शाखेच्या १२वीच्या विद्यार्थ्यांना ५ हजार ९३९ रुपये फी आकारली गेली. डिग्री कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकडून ९ हजार ९२ रुपये, द्वितीय वर्षाकरिता अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८ हजार ४२२ रुपये फी वसूल केली जात आहे, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.  

सरसकट फी वसुली अनुदानित तुकड्यांत शिक्षणाऱ्या म्हणजे सवलत लागू असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडूनही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांइतकीच फी वसूल केली जात आहे, असा प्राध्यापकांचा दावा आहे. या फी वसुलीच्या पावत्या प्राध्यापकांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडे सादर केल्या आहेत. उपसंचालकांनी याप्रकरणी लेखापरीक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे.  

सरकारी समिती काय करते?शाळा, कॉलेजची फी किती असावी हे निश्चित करणारी एक सरकारी समिती असते. या समितीने या प्रकरणाची दखल घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांकडून फी वसूल केल्याप्रकरणी सरकारची समिती दखल घेते की नाही हा प्रश्न आहे. या संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्याशी चर्चा करतो, असे सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयdombivaliडोंबिवलीEducationशिक्षणStudentविद्यार्थी