भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Published: February 2, 2024 04:58 PM2024-02-02T16:58:44+5:302024-02-02T17:00:37+5:30

सांस्कृतिक शहर, पण क्रीडाक्षेत्रातही डोंबिवलीकर कधीही मागे राहिलेले नाहीत.

Huge response to BJP's chess tournament in dombivli | भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

अनिकेत घमंडी,डोंबिवली: सांस्कृतिक शहर, पण क्रीडाक्षेत्रातही डोंबिवलीकर कधीही मागे राहिलेले नाहीत. बुद्धीचे खेळ असले की डोंबिवलीकर सगळ्यात पुढे असतात. अनेक डोंबिवलीकरांनी बुद्धीबळाच्या पटावर आपली चुणूक दाखवून दिली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजप युवा मोर्चाच्या वतीने 'नमो चषक २०२४' या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत भाजयुमो डोंबिवलीच्या वतीने डोंबिवलीकरांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यानिमित्ताने त्यांनी वरील मत व्यक्त केले. 

अपेक्षेप्रमानेच डोंबिवलीकरांनी या बुद्धिबळ स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती संयोजक प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी दिली. खेळाडूंमध्ये उत्साह होता. हेच बुद्धिबळपटू पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रासह देशाचं नाव नक्कीच मोठं करतील असा विश्वास वाटतो. तसंच यांच्यातीलच एखाद-दूसरा खेळाडू एक दिवस या बुद्धिबळाच्या पटावरचा ग्रँडमास्टर व्हावा अशी आशा आहे. या स्पर्धेवेळी भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष विशू पेडणेकर, पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, माजी नगरसेवक संदीप पुराणिक, जुगल उपाध्याय, अमोल पाटील, डोंबिवली विधानसभा संयोजक संजीव बिडवाडकर, पूर्व मंडल सरचिटणीस मितेश पेणकर, प्रकाश पवार, मंडल सोशल मीडिया संयोजक अथर्व कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Huge response to BJP's chess tournament in dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.